
“आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणी सांगावं की, (सुधाकर पांढरे यांचा कार्यकाळ सोडला तर बहुतांश सत्ता ही चव्हाणांचीचं) ७० वर्षांपासून नांदेडात सत्ता चव्हाणांचीचं अर्थात अशोकरावांचीच होती हो मुख्यमंत्री साहेब”
तिकडे…!
लोहा न.पा.निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आ.प्रतापराव पा.चिखलीकर यांनी भाजपचा सुफडा साफ करून टाकला, आ.चिखलीकरांनी लोह्यात भाजपाला व्हाइट वॉश तर दिलाच तिकडे कंधार न.पा.निवडणुकीत भाजपला खातेही उघडू दिले नाही याबाबत तोंडात गुळणी धरून बसलेले नेते मात्र कुठेच काहीच बोलत नाहीत. जसे कंधार लोह्यामध्ये भाजपाला आ.प्रतापराव पा.चिखलीकर यांनी घोळसून काढले तसेच तगडे आव्हान नांदेड वाघाळा मनपाच्या निडणुकीत उभे केले आहे…!
नांदेड (डॉ.प्रदीप राजपूत) नांदेड-वाघाळा मनपा च्या निवडणुकी पित्यर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेड ला प्रचार सभा झाली, (सभेला आलेल्या-आणलेल्या श्रोत्यांना सभा झाल्यावरही माहित नव्हते की आलो कुणासाठी,आणले कुणासाठी व सभा कुणाची होती? जाऊद्या ते समजून घ्यायचे असते) परंतू प्रचार सभेला म्हणजे अशोकरावांनी आयोजित केलेल्या जाहीर सभेला मुख्यमंत्री नांदेड ला येतात आणि अशोकरावांना साक्षीला ठेवून म्हणतात की, मागच्या ७० वर्षात नांदेड शहराचा विकासचं झाला नाही? आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणी सांगावं की, मागच्या ७० वर्षांपासून नांदेड नगरपालिकेपासून सत्ता ही चव्हानांचीचं राहिलेली आहे (सुधाभाऊ पांढरे यांची एक टर्म वगळता) जबाबदार मुख्यमंत्री भाषण करतांना म्हणतात काय अवस्था नांदेडची उद्योगधंदे नाहीत, बेरोजगारी,रस्ते,खड्डे,अतिक्रमण,डासं, घाणपाणी, आणि हे भाषण ऐकून व्यासपीठावर बसलेले दस्तूरखुद्द अशोकराव चव्हाण टाळ्या वाजवत होते, अशोकरावांना टाळ्या वाजवीतांना पाहून बाकीचे सगळे पण टाळ्या वाजवत होते, कहर तर तेव्हा झाला, जे नांदेड चे महापौर राहिलेले आहेत ज्यांनी सत्तेची फळे खाल्ली-चोखली? ते सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणावर टाळ्या वाजवीत होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असे भाषण ऐकून व अशोकराव साहित सगळेच टाळ्या वाजवीत असल्याचे पाहून काही लोकांना सुधारतचं नव्हते की नेमकं काय चालू आहे? ऐका श्रोत्याने तर स्वतःला चिमटा काढून पाहिला तर दुसरा म्हणत होता, भाषण पूर्ण होईपर्यंत बेहोश होतुस की नाही?सभा झाल्यावर कोमात जाऊ नको की झालं? अशी टिंगल टवाळी चालुसभेत होत होती आणि सभा झाल्यावर भडकलेला एक गडी म्हणाला साहब आये, और ….तीयोको…तिया बनाकर चले गये? आता तो गडी कोणाला अशा उपमा देवून गेला हे देखील अजूनही काही लोकांना कळाले नाही? असे समजा वे का!
पुर्वी राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा, जाहीर सभा म्हटलं की, विरोधकांवर टिका-टिप्पणी करायचे,विरोधकांचे लफडे-भ्रष्टाचार काढायचे, आरोप-प्रत्यारोप करायचे पण आज महाराष्ट्रातही तसंच,नांदेडात सुद्धा कोण कोणाचे विरोधक आहेत हे जनतेला काढायलाच मार्ग नाही, भाजपा,काँग्रेस,हे एकदुसऱ्याचे विरोधक होते, मागून एमआयएम आली आणि दोन्ही हाताला तेल लावून बोंब मारणारे त्यांची सुद्धा कुठंतरी युती झाली म्हणं? कुठे कुठे तर भाजपाने चक्क काँग्रेस सोबतच युती केल्याचे वृत्त येत आहे म्हणं? म्हणजे गांव पातळीवर कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षासाठी,निवडणुकीसाठी एकदुसऱ्याचे डोके फोडायचे, आयुष्यभरासाठी वैर करून घ्यायचे आणि राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांचे असले एकदुसऱ्यांसोबत ईलू-ईलू..? मुख्यमंत्री लोह्याला आले तेव्हा तर त्यांनी भाषण काय केले हेच समजलं नसल्याची टिका झाली, देवेंद्र फडणवीस यांच्या लोह्याच्या सभेत गोंधळ सुरु झाला तरीही मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरूच? नांदेड ला ही तसचं, एक काळ असा होता की, मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली की रात्रीतून चित्र पालटून जायचे, आता मुख्यमंत्री लोह्यात येऊन गेल्यावरही लोह्यात भाजपा साफ, भाजपाचा दारुण पराभव, कंधारात तर भाजपाला भोपळा खातं ही उघडलं नाही आणि आता नांदेड च्या सभेतील हे असले भाषण, काय समजावं मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा म्हणजे फक्त आता काय एक औपचारिकता समजावी की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असल्याचे दिसत आहे.