
कंधार (ले.वा.वृत्तसेवा )
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयपीएस अबीनाशकुमार यांच्या आदेशाला तामील करत कंधार पोलिसांनी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व कंधारच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शना नुसार कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी धडाकेबाज कारवाई केली असून पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब सानप व श्रीमती,स्नेहा पिंपरखेडे यांनी पोलीस पथक घेऊन पेठवडज जवळच असलेल्या मंगनाळी येथील शेतात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सिनेस्टाईल पद्धतीने धाड टाकून सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ८ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक आयपीएस अविनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार,व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि कंधारच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शना खाली कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या सूचनेनुसार कंधार पोलिसांनी तालुक्यातील पेठवडज जवळील मंगनाळी शिवारात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर सिनेस्टाईल पद्धतीने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. जवळ पास एक किलोमीटर पाई चालत जावून, साध्या वेशात कंधार पोलिसांनी अचानक धाड टाकली व कारवाईत १७५८५ रुपये रोख, ४ मोबाईल व ३ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह कंधार पोलिसांनी ऐकूण २,२७,५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम -१२(अ )नुसार गुरन ४७/२०२६ अन्वये ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे,पोलिसांनी मंगनाळी येथील एका शेतात झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून या प्रकरणी ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, ही कामगिरी कंधार चे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव,पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब सानप, श्रीमती, स्नेहा पिंपरखेडे,पोहेकॉ देविदास गित्ते पहेलवान,सुनील साखरे,पोकॉ अंकुश पवार, गणपत केंद्रे, धोंडिबा नागरगोजे या पथकाने केली असून,पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी कंधार चे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व त्यांच्या या सर्व पथकाचे कौतुक केले आहे.