Uncategorized

आमदार सतीश चव्हाण यांना पुन्हा आमदार करण्यासाठी आमदार प्रतापराव पा.चिखलीकर सरसावले..! युती धर्म कसा पाळायचा असतो हे आ.चिखलीकरांनी अनेकदा दाखवून दिले..!

“दिलेला शब्द पाळणारे आ.प्रतापराव पाटील तब्येत ठीक नसतांनाही आ.सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संभाजीनगर मध्ये दाखल “

कंधार/नांदेड
(डॉ.प्रदीप राजपूत)

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस (अप) शिवसेना (शिंदे) या महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा आ.सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
महायुतीचे उमेदवार म्हणून आ. सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दि. ५ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे दाखल करण्यात येत असल्यामुळे मराठवाड्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँगेस (अजितदादा पवार) पक्षाचे जेष्ठ आमदार जे की,नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत,ते आ.प्रतापराव पाटील चिखलीकर हे आपल्या महायुतीचे उमेदवार असलेले आ.सतीश चव्हाण यांचा उमेदवारी दाखल करण्यासाठी औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये दाखल झाले आहेत.

विशेष बाब म्हणजे लोहा-कंधारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पा.चिखलीकर हे गुरुवारी रात्री प्रवास करून आल्यानंतर त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना बेडरेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आला होता,मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची उमेदवारी आ.सतीश चव्हाण यांना जाहीर केली आणि आपल्या महायुतीतील तिन्ही पक्ष प्रमुखांनी आपल्या आमदारांना सूचना करतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांचा आदेश शिरसावंध्य मानून लोहा-कंधार येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.प्रतापराव पा.चिखलीकर हे प्रकृती ठीक नसतांनाही महायुतीचा धर्म पाळण्यासाठी रविवारी रात्री औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये दाखल झाले.
युतीचा धर्म कसा पाळला जातो, हे प्रतापरावांनी आजही दाखवून दिले आणि यापूर्वीही अनेकदा दाखविले आहे! या बाबत आमदार प्रतापराव पा.चिखलीकर यांच्याशी दूरध्वनीवरून विचारणा करावी म्हणून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही! परंतू लोहा-कंधार चे जेष्ठ आमदार प्रतापराव पा.चिखलीकर हे आ.सतीश चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून सक्रिय झाल्यामुळे आ.सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जात आहे, कारण विगत निवडणुकीतही प्रतापरावांनी आ.सतीश चव्हाण यांना या भागातून मोठे मताधिक्य मिळवून दिले होते असे सर्वत्र बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!