Uncategorized

आरोग्य सेवा संचालक डॉ.विजय कंदेवाड नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर ” राष्ट्रीय आरोग्य मोहिमेच्या कामाची घेतली आढावा बैठक ” सिकलसेल ऍनेमीया अभियानावर विशेष भर, किनवट सारख्या आदिवासी क्षेत्रात जावून केली प्रत्यक्ष पाहणी

जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांच्या सिकलसेलच्या कामाचे केले कौतुक तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके यांच्या अर्बन भागातील कामाबद्दल व्यक्त केले समाधान

नांदेड (डॉ.प्रदीप राजपूत यांजकडून)

ऐकेकाळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक राहिलेले आणि आता विद्यमान संचालक आरोग्य सेवा (पुणे) असलेले डॉ.विजय कंदेवाड यांनी दि. ४ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला,या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात एक महत्त्वाची बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा आणि मार्गदर्शन करून या बैठकीत डॉ.विजय कंदेवाड यांनी सध्या सुरू असलेल्या सिकलसेल ॲनिमिया अभियानाबद्दल विशेष मार्गदर्शन करत सूचना दिल्या. यासोबतच कुष्ठरोग (Leprosy), क्षयरोग (TB), कुटुंब नियोजन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, असंसर्गजन्य आजार, एन.आर.सी. (NRC), कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थकेअर आणि आय.पी.एच एस (iphs). यांसारख्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी उपस्थितअधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण दिशा-निर्देश दिले या बैठकी दरम्यान क्षय रुग्णाला फूड बास्केट चे वाटप करण्यात आले.

या बैठकीला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ज्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हिराणी सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.राजाभाऊ बुटे,माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड सहाय्यक संचालक आरोग्यसेवा(कुष्ठरोग) डॉ.बालन, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मुरमुरे,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे
तसेच सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांचे अधिकारी, कर्मचारी आणि समन्वयक उपस्थित होते.
क्षेत्रीय भेट आणि प्रत्यक्ष पाहणीसाठी या आढावा बैठकी नंतर डॉ.विजय कंदेवाड यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या विशेषतः किनवट तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागात जाऊन त्यांनी आरोग्य सेवांची पाहणी केली सिकलसेलअभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून चौकशी केली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांच्या सिकलसेल कामाचे विशेष कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!