Uncategorized

हॉटेल्स,लॉन्स,मंगलकार्यालयांमध्ये फक्त कमर्शीअल एलपीजी गॅसचा वापर करणे बंधनकारक..!- जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश

मंगल कार्यालये,लॉन,हॉटेल्स व केटरिंग सेवांच्या ठिकाणी दर्शनी भागात सूचना फलक लावण्याचेही जिल्हा प्रशासनाचे निर्देश

हॉटेल्स,लॉन्स,मंगलकार्यालयांमध्ये फक्त कमर्शीअल एलपीजी गॅसचा वापर करणे बंधनकारक..!- जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश

मंगल कार्यालये,लॉन,हॉटेल्स व केटरिंग सेवांच्या ठिकाणी दर्शनी भागात सूचना फलक लावण्याचेही जिल्हा प्रशासनाचे निर्देश

नांदेड-कंधार
(डॉ.प्रदीप राजपूत)

नांदेड जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन,हॉटेल्स तसेच केटरिंग सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांनी स्वयंपाकासाठी व अन्य कामांसाठी केवळ व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी गॅस सिलिंडरचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यासंदर्भात संबंधित आस्थापनांच्या स्वयंपाकघराच्या दर्शनी भागात व्यावसायिक गॅसच्या वापराबाबत स्पष्ट सूचना फलक लावण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणे हा जीवनावश्यक वस्तू कायदा,१९५५ अन्वये दंडनीय अपराध आहे.

*दर्शनी भागात सूचना फलक लावणे अनिवार्य*

प्रत्येक मंगल कार्यालय,लॉन,हॉटेल आणि केटरिंग सेवा पुरवठादाराने आपल्या स्वयंपाकघराच्या दर्शनी भागात “येथे केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचाच वापर केला जाईल. घरगुती गॅसचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे.” असा स्पष्ट आणि ठळक सूचना फलक लावणे आवश्यक आहे.

*घरगुती गॅसच्या वापरावर पूर्णपणे बंदी*
व्यावसायिक कारणांसाठी कोणत्याही परिस्थितीत घरगुती एलपीजी सिलिंडरचा वापर किंवा त्याचा अवैध साठा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित आस्थापना चालकांनी आपल्या आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरची उपलब्धता व वापर याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी.

विशेष तपासणी मोहीम

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पुरवठा विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान कोणत्याही व्यावसायिक आस्थापनामध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा अवैध वापर अथवा साठा आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा,१९५५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये,लॉन,हॉटेल्स,केटरिंग सेवा पुरवठादार तसेच इतर व्यावसायिक आस्थापना चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे आणि तपासणी मोहिमेदरम्यान प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.(जिमाका-ले.वा.वृत्तसेवा)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!