Uncategorized

कंधार नपा चे ५ उमेदवारांसह नांदेड जिल्ह्यातील ४४ उमेदवार तीन वर्षांसाठी नगर पालिका सदस्य होण्यास अपात्र..?

कंधार नपा चे ५ उमेदवारांसह नांदेड जिल्ह्यातील ४४ उमेदवार तीन वर्षांसाठी नगर पालिका सदस्य होण्यास अपात्र..?

नांदेड- कंधार (डॉ.प्रदीप राजपूत)

नांदेड जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये पार पडली. या निवडणुकीत उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा विहित कालावधीत व विहित पद्धतीने हिशोब संबंधित कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक होते.

मात्र, निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत व विहित पद्धतीने सादर न करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील ४४ उमेदवारांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १६(१ड) अन्वये तीन वर्षांच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास अनर्ह ठरविण्यात आले आहे.

याबाबतचे आदेश दि. २७ जुलै २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले असून, संबंधित उमेदवारांची नावे दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

अनर्ह ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये उमरी नगरपरिषद ६, भोकर नगरपरिषद २, लोहा नगरपरिषद १, हिमायतनगर नगरपंचायत १४, धर्माबाद नगरपरिषद ६, किनवट नगरपरिषद ७, मुखेड नगरपरिषद ३ आणि कंधार नगरपरिषद ५ अशा एकूण ४४ उमेदवारांचा समावेश आहे.

निवडणूक खर्चाचा हिशोब विहित वेळेत सादर करणे हे प्रत्येक उमेदवाराचे कायदेशीर कर्तव्य असून, त्याचे पालन न केल्यास कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!