कंधार (डॉ.प्रदीप राजपूत)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त येताच लोहा-कंधार परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे,अजितदादा पवार हे मुंबईहून आपल्या घरी बारामती कडे विमानाने निघाले होते, बारामतीच्या विमानतळजवळचं लँडिंग समयी त्यांचे विमान जमिनीवर कोसळल्याने विमानाच्या पायलट सहित अजितदादा पवार व त्यांच्या सोबत असलेल्या सर्वांचे या विमान अपघातात निधन झाले .
” अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाचे वृत्त कळताचं राष्ट्रवादी काँग्रेस चे लोहा-कंधार येथील आमदार प्रतापराप पा. चिखलीकर यांना अश्रू अणावर झाले ”
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष होते,आणि नांदेड जिल्ह्यात, लोहा-कंधार विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आहेत, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे अजितदादांचे अतिशय विश्वासू व जवळचे आमदार त्यामुळे अजितदादांच्या अकाली निधनाने प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अजितदादांच्या अकाली जाण्याने लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाची मोठी हानी झाली असून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कधी नं भरून निघणारे वैयक्तिक नुकसान झाल्याचे ही बोलले जात आहे.दोन-तीन दिवसापूर्वी अजितदादा पवार हे हिंद-दि-चादर या कार्यकामासाठी नांदेड ला आले होते, स्पष्ट वक्ता असलेल्या या धडाकेबाज लोकनेत्याचा हा नांदेड चा अखेरचा दौरा ठरला, हे शल्य मनाला सदैव बोचत राहील, वरिल छायाचित्रात दिसत असलेली लोहा-कंधार चे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची आणि अजितदादा पवार यांची भेट ही देखील भेट कदाचित अखेरची भेट असावी..!
अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व अध्यक्ष असले तरी इतर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत,कार्यकर्त्यांसोबत थेट व जिव्हाळ्याचे संबंध आणि थेट संपर्क असल्यामुळे सर्वत्र दुखवटा व्यक्त होत आहे.
————————————–
” लेखणीचे वादळ तथा डॉ.राजपूत परिवाराच्या वतीने आदरणीय अजितदादा पवार यांना भावपुर्ण श्रद्धांजली ”
—————————————