Uncategorized

अबब..! गावाची लोकसंख्या पंधराशे अन जन्ममृत्यूच्या नोंदी पंधरा हजार..? =================== कंधार तालुक्यातील ग्रामपंचायती मधे “सीआरएस” च्या नावाखाली अंधार..! =================== सावळेश्वर ग्रामपंचायत मध्ये सावळा गोंधळ..? ===================

सावळेश्वर च्या ग्रामसेवकांनी स्पष्ट केले की,मी फक्त एकच जन्माची नोंद केलेली आहे व ते पण तहसीलदार यांच्या आदेशावरूनकंधार (डॉ.प्रदीप राजपूत)      खा.किरीट सोमय्या यांनी सावळेश्वर ग्रामपंचायत च्या या जन्म नोंदीच्या घोटाळ्याला घेऊन राष्ट्रीय सुरक्षा बाबत चिंता व्यक्त केली असून हे काम कोण्या एकट्याचे नसून मोठी टोळी सक्रिय असल्याची शंका व्यक्त केली.

कंधार तालुक्यातील ग्रामपंचायती या नां त्या कारणाने व अनेक प्रकारच्या भ्रष्टाचार व घोटाळ्यांमुळे महाराष्ट्रभर गाजत असतांनाचं सावळेश्वर येथील ग्रामपंचायतीतील एक धक्कादायक व गंभीर प्रकार समोर आला आहे.

सावळेश्वर ता.कंधार या गावाची लोकसंख्या पंधराशे सांगण्यात येत असून सावळेश्वर ग्रामपंचायत मध्ये सण २०२५ मध्ये जन्ममृत्यूच्या पंधरा हजार पाचशे सत्तर नोंदी असल्याची गंभीर बाब समोर आल्याने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सावळेश्वर ग्रामपंचायत मधील सदरील जन्ममृत्युंच्या नोंदी ह्या “सीआरएस ” या प्रणाली द्वारे करण्यात आल्या असल्याचे बोलले जात असून नोंदी ह्या सीआरएस प्रणाली हाताळणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आयडी व त्यांना देण्यात आलेल्या गोपनीय पासवर्ड द्वारे लॉगिन करूनच केल्या जात असाव्यात अथवा केल्या गेल्या पाहिजेत असा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लिखित आदेश असेलचं आणि त्यातल्या त्यात लॉगिन आय डी वापरणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या फिंगर प्रिंट लावून थंब एम्प्रेशन करूनचं जर ग्रामपंचायतचे सीआरएस ओपन होत असेल तर मग हे कोणी तरी हॅक करून नोंदी केल्या असतील असे कसे म्हणता येईल दुसरी कडे जर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या फिंगर प्रिंट लावल्या शिवाय सीआरएस ओपनचं होत नसेल तर मग कोणालाही या गैरप्रकाराची व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेल्या अशा घोटाळ्याची जबाबदारी झटकता येणार नाही, या बाबत चाचपणी केली असता कोणी म्हणते मला माहित नाही, कोणी म्हणते या नोंदी कोणी केल्या आम्हाला माहित नाही अतिशय महत्वाची व अजून एक धक्कादायक बाब अशी ही समोर येत आहे की, सावळेश्वर च्या ग्रामसेवकांनी सन २०२५ या वर्षात मी फक्त एकच नोंद ग्रामपंचायत सावळेश्वर कार्यालयात केली असून ती नोंद सुद्धा तहसीलदार यांच्या आदेशानुसार केली असल्याची बाब समोर आल्याने सावळेश्वर ग्रामपंचायत मधील जन्ममृत्यू नोंदणी घोटाळ्यात नवीनच व मोठा ट्वीस्ट आला आहे.
——————————————
खा.किरीट सोमय्या आता हा विषय उचलून धरणार..?
महाराष्ट्रातील अनेक घोटाळे उजागर करून भ्रष्टाचारी बांडगुळांचे पितळ उघडे पाडणारे खा.किरीट सोमय्या यांनी मुंबईहून येवून सावळेश्वर या ठिकाणी भेट देवून या घोटाळ्याची माहिती नेल्याचे कळते.
कंधार तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत असे व तत्सम गंभीर प्रकार झालेले असल्याची चर्चा आता दाबक्या आवाजात सुरु झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!