Uncategorized

नांदेड जिल्ह्यात सिकलसेल तपासणी मोहीम फत्ते झाली, आता डीएचओ डॉ.संगीता देशमुख कुष्ठ कार्यात अग्रेसर..! ======== नेरली येथील ‘नंदनवन कुष्ठधाम’ ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली भेट.! ========== “आरोग्य तपासणी,उपचार व कुष्ठरुग्णांना साहित्य आणि खाऊचे वाटप” ========== अनेमिया,सिकलसेलचं नव्हे तर सर्वच नॅशनल हेल्थ प्रोग्राम ला घेऊन डीएचओ डॉ.संगीता देशमुख ह्या दक्ष दिसत आहेत..! ==========

नांदेड : ले.वा.वृत्त सेवा (डॉ.प्रदीप राजपूत यांजकडून)

तमाम महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातही सुरु असलेल्या सिकलसेल तपासणी व उपचार मोहिमेचा दि.७ फेब्रुवारी रोजी समारोप करून लगेच ९ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा परिषदेचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी नेरली येथील नंदनवन कुष्ठधामाला भेट दिली, नुसतीच भेट दिली नाही तर स्वयंपाक घरापासून सर्व परिसराची पाहणी करून कुष्ठरुग्णांची आरोग्य तपासणी व उपचार तसेच त्यांना खाऊ व साहित्य वाटप देखील गेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख एव्हड्यावरच थांबल्या नाहीत, कुष्ठरुग्णांच्या पायाच्या संवेदना कमी झालेल्या असतात, त्यामुळे पायाला मार लागलेला अथवा जखम झालेली कुष्ठरुग्णांना कळत नाही, त्यापासून बचाव व्हावा या हेतूने डॉ.संगीता देशमुख यांनी तेथील कुष्ठरुग्णांना MCR ही विशिष्ट मटेरियल पासून बनविण्यात आलेली चप्पल देखील दिली.
यावरून असे दिसते की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख ह्या अनेमिया,सिकलसेलचं नव्हेतर आरोग्य विषयक असलेल्या सर्वच राष्ट्रीय कार्यक्रमांच्या बाबतीत ही तेव्हढ्याच दक्ष आहेत असे कालच्या त्यांच्या कुष्ठकार्यावरून दिसून येत आहे.

 

कुष्ठरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. याच भावनेतून ” स्पर्श “कार्यक्रम जिल्ह्यात सूरू असलेल्या कुष्ठ रोग निर्मूलना चे औचित्या साधून नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख आणि सहसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ.बालन यांनी नुकतीच नेरली येथील ‘नंदनवन कुष्ठधाम’ला भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला व त्यांना आवश्यक साहित्याचे वाटप केले.
साहित्य वाटप आणि आरोग्य तपासणी ही करण्यात आली असून या भेटी दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते कुष्ठरुग्णांना विशेष प्रकारच्या एम.सी.आर. (MCR) चपला,आणि कुष्ठ रुग्ण व प्रौढ मतिमंद मुलांना पौष्टिक खाद्यान्न आणि डिंकाच्या लाडूंचे वाटप करण्यात आले केवळ साहित्य वाटप करून न थांबता, यावेळी विशेष आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सर्व रुग्णांची सर्व प्रकारच्या रक्त तपासणी करण्यात आली,
बीपी (रक्तदाब) आणि शुगर (मधुमेह) तपासणी करण्यात आली.
रुग्णांना फॉलिक ॲसिड आणि रक्तवाढीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
स्वयंपाकघराची पाहणी आणि कर्मचाऱ्यांना सूचना
डॉ.संगीता देशमुख यांनी कुष्ठधामातील स्वयंपाकघराची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला विशेष म्हणजे, कुष्ठरुग्णांसाठी स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचीही संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. रुग्णांचा आहार सकस असावा आणि त्यांनी नियमित व्यायाम करावा, याबद्दल डॉ.देशमुख यांनी मार्गदर्शन केले तसेच, कुष्ठरुग्णांना कोणत्याही आरोग्य सेवेपासून वंचित ठेवू नका,अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिल्या नंदनवन कुष्ठधाम येथील श्री गायकवाड यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येवून परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेतला.

या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. मीरकुटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे, विस्तार अधिकारी इंगळे आणि नेरली आरोग्य उपकेंद्रातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे कुष्ठरुग्णांच्या चहेऱ्यावर समाधान दिसून येत असून सिकलसेलचं नव्हे तर इतर ही राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमांना घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख ह्या दक्ष आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!