ऊसतोड कामगारांच्या विविध समस्यासंदर्भात
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
नांदेड (डॉ.प्रदीप राजपूत)
गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया संदर्भात शासन निर्णयानूसार जिल्हास्तरीय समितीजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीची नुकतीच जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यविषयक विविध समस्यां बाबत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड महिला कामगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यामध्ये अनावश्यकरित्या गर्भ पिशवी काढण्याचे प्रमाण मोठे आहे. ऊसतोड महिला कामगार हे फक्त बीड जिल्ह्यापुरते मर्यादित नसून ते ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील मुखेड, हदगाव, उमरी, कंधार, अर्धापूर, नांदेड येथे ऊसतोड करण्यासाठी ये-जा करत असतात. त्यामुळे अशा ऊसतोड महिला कामगारांचे अनावश्यकरित्या गर्भ पिशवी काढली जाऊ नये यासाठी जिल्ह्यांतर्गत आरोग्य संस्थेमार्फत मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात यावी. सदरील बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या.
फॉगशी समिती नांदेड मार्फत जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ (सर्व) यांनी ऊसतोड महिला कामगारांची वैद्यकीय कारणाशिवाय गर्भपिशवी काढण्यात येऊ नये,याबाबत सूचना द्याव्यात व तसा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड यांना सादर करावा.
गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात ऊसतोड महिला कामगारांनी एकाच वैद्यकीय सल्ल्यावर अवलंबून न राहता आणखी एका स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जिल्ह्यामध्ये ज्या रुग्णालयात (शासकीय व खाजगी) गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया जास्त प्रमाणात होतात. त्या ठिकाणी जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात यावी व कारणमिमांसा करावी.
खाजगी रुग्णालयात गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात संबंधित महिलेचे दस्तावेज ठेवणे बंधनकारक आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत आशा, आरोग्य सेविका यांच्या द्वारे ऊसतोड महिला कामगारांना हेल्थ कार्ड वाटप करावे. तसेच ऊसतोड महिला कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी, लसीकरण, समुपदेशन इत्यादी आरोग्यविषयक बाबींची तपासणी करण्यात याव्यात. याचबरोबर समाजकल्याण, महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजना संबंधित माहिती ऊसतोड महिला कामगारांना देण्यात यावीत. त्यासंबंधी मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्यात यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.
सदरील बैठकीस निवासी जिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.संजय माणिकराव पेरके, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख यांचे प्रतिनिधी प्राध्यापक डॉ.शिरीष दुलेवाड,वैद्यकीय महाविद्यालय नांदेड. जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. शिवशक्ती पवार जि.प. नांदेड,अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, जिल्हा रुग्णालय नांदेड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, फॉगशी समिती नांदेड च्या अध्यक्षा डॉ.मीनल पाटील,स्वंयसेवी संस्थेच्या प्रतिनिधी श्रीमती सुषमा गहेरवार, हे उपस्थित होते.
फॉगशी समिती नांदेड मार्फत जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ (सर्व) यांनी ऊसतोड महिला कामगारांची वैद्यकीय कारणाशिवाय गर्भपिशवी काढण्यात येऊ नये,याबाबत सूचना द्याव्यात व तसा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड यांना सादर करावा.
गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात ऊसतोड महिला कामगारांनी एकाच वैद्यकीय सल्ल्यावर अवलंबून न राहता आणखी एका स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जिल्ह्यामध्ये ज्या रुग्णालयात (शासकीय व खाजगी) गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया जास्त प्रमाणात होतात. त्या ठिकाणी जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात यावी व कारणमिमांसा करावी.
खाजगी रुग्णालयात गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात संबंधित महिलेचे दस्तावेज ठेवणे बंधनकारक आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत आशा, आरोग्य सेविका यांच्या द्वारे ऊसतोड महिला कामगारांना हेल्थ कार्ड वाटप करावे. तसेच ऊसतोड महिला कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी, लसीकरण, समुपदेशन इत्यादी आरोग्यविषयक बाबींची तपासणी करण्यात याव्यात. याचबरोबर समाजकल्याण, महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजना संबंधित माहिती ऊसतोड महिला कामगारांना देण्यात यावीत. त्यासंबंधी मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्यात यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.सदरील बैठकीस निवासी जिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.संजय माणिकराव पेरके, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख यांचे प्रतिनिधी प्राध्यापक डॉ.शिरीष दुलेवाड,वैद्यकीय महाविद्यालय नांदेड. जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. शिवशक्ती पवार जि.प. नांदेड,अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, जिल्हा रुग्णालय नांदेड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, फॉगशी समिती नांदेड च्या अध्यक्षा डॉ.मीनल पाटील,स्वंयसेवी संस्थेच्या प्रतिनिधी श्रीमती सुषमा गहेरवार, हे उपस्थित होते.