Uncategorized

पेट्रोल-डिझेल बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये..! ========== जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे जनतेला आवाहन

नांदेड : ले.वा.वृत्तसेवा (डॉ.प्रदीप राजपूत यांजकडून)

दि.४ मार्च
आजमितीला मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत देशात इंधनाचा,डिझेल-पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे व डिझेल-पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत अशा अफवा जनतेमध्ये पसरत आहेत, या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जनतेला केले आहे.

काही देशात निर्माण होत असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे डिझेल -पेट्रोल चा तुटवडा निर्माण होऊन डिझेल -पेट्रोल चे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत अशा अफवांमुळे नांदेड जिल्हा तसेच शहरामधील मधील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी केल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
जिल्हा प्रशासनाने स्पष्टपणे कळविले आहे की,पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही तसेच इंधनदर वाढीचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे प्राप्त नाही,ही माहिती पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,नांदेड जिल्ह्यात इंधन साठा सुरळीत असून पुरवठा नियमित पद्धतीने सुरू आहे.
       त्यामुळे पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी जनतेनी घाईगडबड करून  पेट्रोल पंपावर गर्दी करण्याचे कोणतेही कारण नाही,जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही प्रकारच्या अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये.तसेच अधिकृत माहिती फक्त शासन व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमांतूनच स्विकारावी,पेट्रोल पंपांवर शिस्त राखावी व अनावश्यक रांगा टाळाव्यात असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सूचित केले आहे.

नांदेड चे जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता व अशा अफवांवर विश्वास न ठेवता आपले दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवावेत असे आवाहन देखील जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नांदेड जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!