
कंधार (डॉ.प्रदीप राजपूत )
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त व पत्रकार दिनाचे औचित्य साधून दि.१३ रोजी कंधार पोलीस स्टेशनच्या वतीने कंधार येथील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
कंधार येथील प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया आदी सर्व पत्रकारांनी कंधार परिसरातील सार्वजनिक उपक्रम असतील अथवा धार्मिक सण असतील अशा विविध उपक्रमात सहभागी होऊन प्रसिद्धी तर दिलीच वेळोवेळी स्थानिक प्रशासन असेल व पोलीस प्रशासन असेल कंधार येथील पत्रकार बांधवानी सदैव सहकार्य केले आहे, या बाबत कृतज्ञता व्यक्त करत पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी उपस्थित सर्व पत्रकारांचा डायरी व लेखणी भेट सन्मान व सत्कार केला.
या प्रसंगी पत्रकार हाफिज घडीवाला,ऍड.डिगंबर गायकवाड,प्रा.गंगाधर तोगरे,रमेशसिंह ठाकूर, डॉ.दिनकर जायभाये,डॉ.प्रदीप राजपूत,सचिन मोरे,माधव भालेराव,राजेश्वर कांबळे,दयानंद कदम,ऍड.रवि कांबळे,प्रल्हाद आगबोटे,सय्यद हबीब,विश्वाम्भर बसवंते,विनोद पा.तोरणे,एस.पी.केंद्रे, मिर्झा जमीर बेग,म.सिकंदर,ऍड.शेख उमर,ऍड. सिद्धार्थ वाघमारे,मुरलीधर थोटे,राजरत्न गायकवाड,निलेश गायकवाड,संभाजी कांबळे,मयूर कांबळे,शुभम केंद्रे,ज्ञानेश्वर कागणे,नरसिंग पाटील,कल्हाळीकर,शेख शादूल,संतोष सोमशे,अनिल वट्टमवार,राहुल कांबळे,टोकलवाड,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते,या कार्यक्रमाचे नियोजन अंमलदार ए.एस.आय.ज्ञानोबा गिऱ्हे पाटील यांनी केले होते या वेळी पी.एस.आय.बालाजी मगर, उपनिरीक्षक एम.ए.वाघमारे,पोलीस हवालदार देविदास गित्ते, पो हेड कॉनिस्टेबल गारोळे, डी.एच.चोपवाड, ए.बी.क्षीरसागर, ए. एम.जोगपेटे, पी. सी. नागरगोजे, जी.अमोल,बाबुराव पांचाळ आदी सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कंधार येथील आठवडी बाजार हा भर रस्त्यात भरत होता,आणि दररोज सुद्धा तीच अवस्था होऊन डिव्हायडर चा वापर देखील या कामासाठी होत असल्यामुळे त्यातून होणारी वाहतुकीची कोंढी व इतर समस्याबाबत पत्रकार बांधवांनी या समस्येला वाचा फोडल्यामुळे हा प्रश्न सध्या तरी दिलासादायक वाटत असल्याचे सांगून पत्रकारांचे अभिनंदन केले.
कंधार परिसतातील विविध सामाजिक,धार्मिक, सण उत्सव असतील त्यामध्ये कंधारच्या पत्रकारांचे नेहमीच सहकार्य लाभले असून नुकत्याच काल पार पडलेल्या बडी दर्गाहच्या उर्स च्या कार्यक्रमात गर्दी मोठ्या संख्येने होती त्या वेळी दै.वतनवाला चे पत्रकार म.सिकंदर यांनी सहकार्य केले असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
शांतता कमिटीच्या बैठकीतही अनेक पत्रकार बांधवांनी महत्वाच्या बाबी व समस्या वेळोवेळी लक्षात आणून दिल्याने पोलीस प्रशासनाला मोठे सहकार्य मिळत असते अशा सर्व विषयांची नोंद घेवून कंधार पोलीस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचा ‘पत्रकार दिन’ निमित्त सन्मान व सत्कार करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
—————————————-
आमचे सहकारी मित्र पत्रकार अनिल वट्टमवार सर यांना यायला उशीर झाला,कार्यक्रम संपला होता, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना नांदेड मनपा च्या कामानिमित्त जायचे होते म्हणून ते घाई घाई आपल्या टेबलवरचं जेवणाचा डब्बा खात होते, असे असतांनाही समोरचे जेवण बाजूला ठेवून त्यांनी पीएसआय श्री.मगर यांना बोलावून घेतले व अनिल वट्टमवार यांचा सत्कार केला, पत्रकार निलेश गायकवाड सरांनी या वेळी आम्हालाही पोलीस निरीक्षक यांच्या दालनात बोलावून घेतल्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांचा हा दिलेरपणा यातून आम्हाला दिसून आला, हे ही विशेष..!————————————