Uncategorized

‘अवकाळी पाऊसकार’ कवी भास्कर गित्ते आज आकाशवाणी वर

कंधार (डॉ.प्रदीप राजपूत)

कंधार येथील प्रसिद्ध कवी भास्कर अर्जूनराव गीते यांचे काव्यवाचन उद्या शुक्रवारी, दि.१६ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ वाजता नांदेड आकाशवाणीवरुन ‘लोकजागर’ या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.
कवी भास्कर गीते हे एसटी महामंडळाच्या नांदेड विभागीय कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध ठिकाणच्या मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून कविता सादर केल्या आहेत. आजपर्यंत त्यांनी २५० पेक्षा अधिक कविता लिहिल्या आहेत. त्यांचा ‘अवकाळी पाऊस’ काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. विविध वर्तमानपत्रे व साप्ताहिकातून त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. साहित्यिक व सामाजिक कामासाठी त्यांना दहाहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे काव्यवाचन उद्या शुक्रवारी, दि.१६ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ वाजता नांदेड आकाशवाणीवरुन‘लोकजागर’ या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.
सदरील कार्यक्रमाचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड आकाशवाणीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!