Uncategorized

[27/07, 15:17] .: नशामुक्त युवा–विकसित भारत अभियानांतर्गत १ऑगस्टला नांदेडमध्ये जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा [27/07, 15:18] .: माय भारत पोर्टलवर नोंदणी करून युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे! – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

माय भारत पोर्टलवर नोंदणी करून युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे! – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नशामुक्त युवा–विकसित भारत अभियानांतर्गत १ऑगस्टला नांदेडमध्ये जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा

माय भारत पोर्टलवर नोंदणी करून युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे! – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड(डॉ.प्रदीप राजपूत)

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत आणि जिल्हा युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत १ऑगस्ट २०२६ रोजी यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील १५ते २९वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माय भारतच्या जिल्हा युवा अधिकारी अश्नी कानकटे यांच्यासह विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या अंतर्गत रील/लघुपट (रील -शॉर्ट फिल्म ), संगीत/रॅप, थीम आधारित नृत्य, नुक्कड नाटक (पथनाट्य), स्लॅम पोएट्री, चित्रकला, घोषवाक्य लेखन तसेच वक्तृत्व-वादविवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणी पोर्टलवरील संबंधित लिंकद्वारे करता येईल.

जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, माय भारत स्वयंसेवक तसेच १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ते यशस्वी करावे,असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी,माय भारत,नांदेड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!