Uncategorized

भ्रष्टाचारी बांडगुळांचा कर्दनकाळ असलेले एसीबी चे एस.पी.श्रीकृष्ण कोकाटे यांना शासनाचे अति उत्कृष्ट सेवेबद्दल पारितोषिक जाहीर..!

नांदेड (डॉ.प्रदीप राजपूत)
कंधार ले.वा.वृत्त सेवा

दिड-दोन लाख रुपये पगार असलेला शासकीय लोकसेवक जेव्हा दिड-दोनशे रुपये रोजंदारीवर मजुरी करणाऱ्या वयोवृद्ध मजुराकडून लाच घेतो, हे पाहिल्यावर,ऐकल्यावर आणि वाचल्यावर कोणाच्याही तळ पायातील आग मस्तकात जाईलचं..! आणि श्रीकृष्ण कोकाटे हे लाचलूचपटत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक आहेत, त्यांनी अशा अनेक भ्रष्ट लोकसेवकांच्या मुसक्या आवळल्या असल्याने नांदेड जिल्ह्यातील अनेक भ्रष्टाचारी बांडगुळांना गजाआड देखील केलेले आहे.श्रीकृष्ण कोकाटे यांचा नांदेड येथील कार्यकाळ बघितला तर असे दिसून येते की, नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी लाचलुचपत विभागाचा पदभार घेतला तेव्हा पासून अतिशय कठोर पणे आपले कर्तव्य बजावले असल्याने लाच घेण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसते! लाचलुचपत विभागाच्या सापड्यात सापडला की, मग तो कोणीही तुर्रमखा असो पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सुता सारखा सरळ तर केलाचं..? त्या भ्रष्टाचारी बांडगुळाला अशी अद्दल घडवितात की,आयुष्यात १० रुपयाची लाच घ्यायलाही हात नव्हे सगळचं चळचळ कापते म्हटलं..! असे हे अतिशय प्रामाणिक व एन्टी करेप्शन खात्याला साजेसे व्यक्तिमत्व असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल संबंधित प्रशासनाने घेतली असून नांदेडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना अति उत्कृष्ट पारितोषिक जाहीर केले आहे.

जनमाणसात नाही तर नांदेड जिल्ह्यातील,नांदेड शहरातील सर्वसामान्य नागरिक असो की,व्यापारी असो की जेष्ठ नागरिक असो या सगळ्यांना आपलेसे वाटणारे लाचलुचपत नांदेड विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना त्यांच्या उत्कृष्ठ कार्यासाठी भारत सरकारने अती उत्कृष्ट सेवा पारितोषक जाहीर केल्याचे समजताच नांदेड अतिशय प्रतिभावंत असलेल्या ‘केसरी जेष्ठ नागरिक संघ’ च्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष रामनारायण बंग यांनी श्रीकृष्ण कोकाटे यांचा सन्मान व सत्कार केला, या समयी सखारामपंत कुलकर्णी, हर्षदशहा,अशोक माढेकर,
डॉ.यशवंतराव चव्हाण,परमानंद तोषणीवाल,अण्णाराव पाटील,
व रत्नाकर जोशी आदी मान्यवर आणि केसरी जेष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!