
कंधार (डॉ.प्रदीप राजपूत)
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची तीन वर्षाची मुदत संपल्यामुळे पुनर्बांधणीची बैठक राज्य कोषाध्यक्ष जी.एस.मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह कंधार येथे घेण्यात आली.
यावेळी विभागीय जि.संघटक युसुफ शेख,उपाध्यक्ष समर्थ एकाळे,जिल्हा उपाध्यक्ष डी.आर.मुंडे,लोहा तालुका नेते बी.टी.भुरे यांची प्रमुख उपस्थिती होती,नूतन तालुका कार्यकारणी
तालुकाध्यक्ष शेख मोबीन,सरचिटणीस नामदेव कल्याणकस्तुरे,कार्याध्यक्ष श्रीकांत कल्याणकर ,कोषाध्यक्ष अंगद गुद्दे, प्रमुख संघटक बालाजी कांबळे, प्रमुख सल्लागार एन.डी. घुमलवाड,उपाध्यक्ष अशोक झडते,एस एस.कंधारे, वसंत जाधव, गोपाळ किरपणे, एम.एस. केंद्रे,संघटक सी.जे.शेख, डी.एस. गर्जे,सल्लागार सुनील गवळे, मुनिर शेख,सहसचिव
युनुस शेख,विक्रम चुकुलवाड
,कार्यालयीन सचिव प्रवीण लव्हाळे यांची निवड करून त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्षहार देऊन सत्कार केला.
जिल्हाध्यक्ष जी.बी.मोरे, जिल्हा सरचिटणीस एम.डी.पेठकर उर्वरित पदे भरण्याचे सर्व अधिकार तालुका शाखेला यांनी देण्यात आल्याचे जाहीर केले वेळी नुकतेच सेवानिवृत्त झालेले समर्थ एकाळे, टीईटी परीक्षेत नुकतेच उत्तीर्ण झालेले तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत कल्याणकर, कोषाध्यक्ष अंगद गुद्दे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार तालुका शाखा कंधार च्या वतीने करण्यात आला